ऑनलाईन फसवणुकीतील आरोपी झारखंड राज्यातून अटकेत

0


ऑनलाईन फसवणुकीतील आरोपी झारखंड राज्यातून अटकेत

उस्मानाबाद सायबर पोलीस ठाणे : “तुमच्या युपीआय ॲपलिकेशनची केवायसी करायची आहे.” असा कॉल परंडा येथील जाकीर मुल्ला यांना आल्याने त्यांनी समोरील अज्ञाताने सांगीतल्याप्रमाणे आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘क्वीकसपोर्ट’ हे ॲपलिकेशन घेउन आपल्या युपीआय खात्यावर व्यवहार केले. दरम्यान समोरील अज्ञाताने या ‘क्वीकसपोर्ट’ ॲपलिकेशनद्वारे मुल्ला यांच्या युपीआय खात्याची- बँक खात्याची माहिती व पासवर्ड जाणून घेउन त्यांच्या खात्यातील 1,62,957 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत केली. आपली फसवणूक झाल्याचे मुल्ला यांच्या लक्षात आल्याने त्यांनी परंडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गु.र.क्र. 165 / 2020 नोंदवण्यात आला.



            पुढील तपासाकरीता उस्मानाबाद येथील सायबर पोलीस ठाण्याची मदत घेण्यात आली. सायबर पोलीसांनी तांत्रीक माहिती गोळा केली असता हा गुन्हा मधुपूर, जि. देवघर, रा. झारखंड येथील मुर्शीद अन्सारी या 22 वर्षीय तरुणाने केला असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास परंडा पो.ठा. च्या सपोनि- श्री. ससाने, पोकॉ- मुलानी, विधाते यांचे पथक झारखंड येथे रवाना झाले होते. तब्बल 7 दिवस झारखंड राज्यात शोध घेउन नमुद आरोपीस अखेर दि. 01.09.2021 रोजी ताब्यात घेउन उस्मानाबाद येथे आनले असून उर्वरीत तपास सायबर पोलीस ठाण्यामार्फत केला जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top