पत्रकार गोपाळ अंहकारी यांचे निधन
उमरगा, ता. ४ : शहरातील पत्रकार गोपाळ शरदराव अंहकारी (वय ४६ वर्ष) यांचे शनिवारी (ता. चार) पहाटे सोलापूर येथील रुग्णालयात ह्ययविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, भावजय व पुतणे, पुतणी असा परिवार आहे. (कै.) गोपाळ अंहकारी गेल्या ३० वर्षापासून पत्रकार क्षेत्रात सक्रिय होते. ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू करावी. ग्रंथालयांचे अनुदानाचा प्रश्न, नवीन ग्रंथालयांना मान्यतेचा प्रश्न, कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेवर वेतन देण्यात यावे या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना व वैद्यकीय योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातुन त्यांनी प्रयत्न केले. (कै.) अंहकारी यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील नागरिक, पत्रकार व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहिती विभागाचे (मंत्रालय, मुंबई) उपसंचालक गोविंद अंहकारी यांचे लहान बंधू होत.
------