उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणूक ,चोरी , अपघात , मारहाण गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणूक ,चोरी , अपघात , मारहाण गुन्हे दाखल


फसवणूक.

नळदुर्ग पोलीस ठाणे : सुरेश माधव नकाते (मयत), रा. नळदुर्ग हे गावातील नाईक मागास समाज सेवा मंडळ येथे नोकरीस होते. त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळु नये या वाईट उद्देशाने त्यांची सेवा पुस्तीका संस्थेतील वैभव व अमोल विठ्ठल जाधव या दोघा बंधुंनी नष्ट करुन दि. 1.12.2020 रोजीच्या कार्यमुक्ती प्रमाणपत्रावर सुरेश नकाते यांची खोटी स्वाक्षरी केली आहे. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- श्रीमती सुलभा नकाते यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथमखबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 467, 468, 471, 477, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी.

तुळजापूर पोलीस ठाणे : अशोक इंगळे, रा. तुळजापूर यांच्या बोरी येथील शेत गोठ्यासमोर ठेवलेल्या दोन म्हशी व शेत शेजारी- महादेव गंधोरे यांची एक जर्सी गाय दि. 4- 5 सप्टेंबर रोजी च्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक इंगळे यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

अपघात.

उमरगा पोलीस ठाणे : चालक- महेश मुसळंबे, रा. तुरोरी, ता. उमरगा यांनी दि. 6 सप्टेंबर रोजी 16.00 वा. सु. तुरोरी गावातील उड्डानपुलाजवळ ॲपेरिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0951 हा निष्काळजीपने चालवून बबन पंडीत माने, वय 30 वर्षे, रा. दाबका हे चालवत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 24 डब्ल्यु 3407 ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- पंडीत माने यांनी अनैसर्गीक मृत्युच्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

ढोकी पोलीस ठाणे : चालक- विजय रामलिंग कांबळे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 17.08.2021 रोजी 16.30 वा. सु. गोवर्धनवाडी येथील रस्ता वळणावर स्कुटर क्र. एम.एच. 25 एयु 3527 ही निष्काळजीपने चालवल्याने घसरली. या अपघातात स्कुटरवर पाठीमागे बसलेले काकासाहेब दासा जाधव, वय 44 वर्षे, रा. गोविंदपुर, ता. कळंब यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ते उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- ध्म्मशिला जाधव यांनी अनैसर्गीक मृत्यूच्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहान.

मुरुम पोलीस ठाणे : येणेगूर येथील सतीश बाबुराव गायकवाड व त्यांचा भाऊ राजेंद्र बाबुराव गायकवाड या दोघांच्या कुटूंबीयांचा जळणास आनलेल्या लाकडावरुन दि. 4 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. राहत्या कॉलनीत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही गायकवाड कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी कुटूंबातील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विळा, लोखंडी नळी, काठी, हातोडीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सतीश गायकवाड व राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 

येरमाळा पोलीस ठाणे : बापु निवृत्ती गोरे, रा. शेलगाव, ता. कळंब हे दि. 09 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. गावातील चोराखळी रस्त्यालगत गुरे चारत होते. दरम्यान ती गुरे रस्त्यावर आडवी आल्याच्या कारणावरुन गावकरी- लक्ष्मण हरी दिवाने यांनी बापु गोरे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गोरे यांच्या हातातीलच चाबकाच्या दांड्याने मारहान केल्याने गोरे यांचा दात अर्धवट तुटून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या बापु गोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top