वाशी तालुक्यात पावसाने झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई मिळावी तहसिलदारांना निवेदन

0
वाशी तालुक्यात पावसाने झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई मिळावी तहसिलदारांना निवेदन


वाशी :- आज दि 9 सप्टेंबर 2021 रोजी तहसीलदार साहेबांना निवेदन करण्यार आले की  मागील आठ दिवसापासून तालुक्यातील पारगाव , तेरखेडा व वाशी मंडळामध्ये पावसाने थैमान घातलेले आहे. पेरणीनंतर दिर्घ खंड यामुळे आधिच पिके करपून गेली होती. त्याचे नुकसान झालेले असताना आता पावसाने आगमन करत धो धो कोसळला तालुक्यातील पिके पाण्यात गेलेली आहेत . त्यामुळे वाशी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या तसेच इतर गावांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे.

 यावेळी नितिन बिक्कड (जिल्हा कार्याध्यक्ष), संतोष पवार (तालुका अध्यक्ष), बालाजी मोठे (विधानसभा अध्यक्ष), शशिकांत अंकुश मोरे, दत्तात्रय मोहनराव चेडे, काझी शहाबाज अहमद, संतोष घुले, सुयश शिवाजीराव उंदरे, अशोक काशिनाथ चेडे, सूभाष साहेबराव सुरवसे, बाळासाहेब रघुनाथ जाधव, दत्ता मारुती रीटे, बालाजी अश्रुबा खंडागळे, नितिन महादेव कांबळे, सुदर्शन गंगाधर सुकाळे, किरण वसंत पवार, अंकूश रामकिसन देशमुख , ज्ञानेश्वर अनिल देशमुख इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top