google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 विरोधकांनी विकासात खोडा घालायचे उद्योग थांबवावे. - खासदार ओमराजे निंबाळकर.

विरोधकांनी विकासात खोडा घालायचे उद्योग थांबवावे. - खासदार ओमराजे निंबाळकर.

0

विरोधकांनी विकासात खोडा घालायचे उद्योग थांबवावे. - खासदार ओमराजे निंबाळकर.

उस्मानाबाद :-  तालुक्यातील खेड येथिल विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा लोकप्रिय शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील आदी मान्यवरांसह गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते संपन्न झाला.

गावातील शिंदे गल्लीतील सिमेंट रस्ता, नामदेव गरड ते रामेश्वर पांचाळ यांच्या घरापर्यंत च्या रस्त्याचे लोकार्पण केले तसेच मातंग समाजासाठी नविन समाजमंदिर उभारणे, केशवनगर येथिल विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप बांधणे, खेड ते आळणी शिवरस्ता, खेड ते भडाचीवाडी शिवरस्ता याकामांचा शुभारंभ केला. 

जिल्ह्यातील नेत्यांनी 30 ते 35 वर्षे राज्याचे मंत्रीपद सांभाळून त्यात महत्वाचे पाटबंधारे खाते घेऊन हि जिल्ह्याचा विकास केला नाही. आम्ही विकासाची कामे करत आहोत. त्यात हि विरोधक खोडा घालण्याचे काम करत आहेत. परंतु विकास कामे करण्यास निधी देण्यास मागे हटणार नाही. अशी ग्वाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आल्या पासून राज्यात शेतकरी, गोरगरिब, सर्व सामान्य नागरिकांची कामे सरकार करत आहेत. यातच राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आपले स्वप्न पूर्ण केले आहे. तसेच मराठवाड्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास चालना देण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गतच्या प्राध्यानक्रमाची मर्यादा वाढवून कळंब तालुक्यातील दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावापर्यंतची कामे यामध्ये समाविष्ट केले आहेत. येत्या 2023 पर्यंत 7 टी एम सी.पाणी दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावात येणार आहे ते आपणांस पहावयास मिळेल. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र कार्यान्वित केले असून लवकरच आपल्या स्वतंत्र विद्यापीठासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशा प्रकारे महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. व अशी जिल्ह्यातील प्रलंबित कामे करत राहणार आहे.

ऑक्टोबर-2020 मधिल अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पीक विमा संदर्भात न्यायालयीन लढा चालू आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे. असे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, सरपंच सुनील गरड, उप सरपंच गणेश गवाड, नितीन घुले, संजय गवाड, सुजित गरड, अशितोष गरड, तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ माने, पवन गरड, ॲड. पांडुरंग गवाड, रमेशनाना गरड, पोपट विरपाटील, नामदेव गरड, हनुमंत पाटील, हनुमंत लोमटे, रमराजे पाटील, जगदीश शिंदे, योगेश गवाड, भानुदास लोमटे, आबासाहेब गरड, सुरेश गवाड, गजेंद्र गवाड, दत्तू सोनार, संभाजी कुंभार, बाबासाहेब लोभे, विकास लोमटे,बूबा शिरसाट, नाना वाघमारे, माणिक औटे, धनाजी वारे, विशाल विर, विकास यावलकर,मारुती गरड, प्रदीप दांगट,ज्ञानोबामाऊली लोमटे, भारत शिंदे, भारत गरड, पवन घुले,किरण पाटील, दत्ता गवाड, काकासाहेब दांगट, विलास दांगट, ग्रा.पं सदस्य बंकट गरड, आनील औटे, विशाल यावलकर तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top