खाजगी बाल रुग्णालयातील कोविड आरोग्य सेवा सुरू करा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
उस्मानाबाद :- खाजगी बाल रुग्णालय येथे कोविड आरोग्य सेवा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज दिनांक १५ सप्टेबर रोजी आदेश दिले आहेत दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की कोरोनाविषाणू संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाचे अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांनी नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयात कोविड बाधा झालेल्या लहान मुलांना उपचारासाठी परवानगी देण्याबाबत विनंती केली आहे जिल्ह्यात कोरोनाविषाणू संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये व covid-19 मधील मार्गदर्शक सूचना या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना प्राप्त झालेला अधिकाराचा वापर करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 33 आणि 65 अन्वये उस्मानाबाद जिल्ह्यातील इमारती ठिकाणे आरोग्य विभागाच्या अधिनस्त म्हणून स्थापन करून पुढील आदेशापर्यंत अनुसूचित व अधिग्रहित करण्यात येत आहेत यामध्ये बिराजदार हॉस्पिटल उमरगा या ठिकाणी ३२ खाटांची व्यवस्था असून covid-19 रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या खाटांची संख्या १० आहे जाधव हॉस्पिटल उमरगा या ठिकाणी एकूण खाटांची संख्या १० असून कोविड बाल रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या खाटांची संख्या १० आहे वात्सल्य चाईल्ड केअर आयसीयू उस्मानाबाद या ठिकाणी एकूण खाटांची संख्या ३५ असून covid-19 रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या खाटांची संख्या १० आहे या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिले आहेत