मच्छीमारांचे आंदोलनाला वेगळे वळण ३२ वर्षीय तरुणाने केले विषप्राशन जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
उस्मानाबाद :- परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पातून स्थानिक मच्छिमारांना परवाने देण्यास यावे या मागणीसाठी जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली तीन सप्टेंबर रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सहाय्यक मत्स्य आयुक्त यांच्या कार्यालयात मच्छिमारांनी ३ सप्टेंबर रोजी आंदोलन सुरू केले होते सुरुवातीला या आंदोलनकर्त्यांनी आयुक्त कार्यालयात रिकाम्या खुर्चीला माशांचा हार घालून अर्धनग्न ठिय्या आंदोलन केले नंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारती वर चढून आंदोलन करत असताना अशोक पोपट नगरे रा. दिलमेश्वर वय वर्षे ३२ या तरुणाने आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले पोलीस घटनास्थळीच असल्यामुळे त्यांनी तात्काळ त्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ गिलबिले यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सांगितली