जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0


जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 


उस्मानाबाद जिल्ह्यात विविध भागात घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक  माहिती अशी की
घरफोडी व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीची गुप्त बातमी दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार  आरोपी अजय दिलीप भोसले वय वर्ष २० रा. पाटोदा पाटी तालुका उस्मानाबाद याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण किंमत ६२ हजार रुपये १५ ग्रॅम वजनाचे गंठण किंमत ६२ हजार रुपये सोन्याचे ३० ग्राम वजनाचे पट्टी गंठण किंमत १ लाख ३५ हजार रुपये सोन्याचे २५ ग्रॅम वजनाचे लॉकेट किंमत १ लाख १२ हजार रुपये सोन्याची ५ ग्रॅम वजनाची अंगठी किंमत २२ हजार रुपये एक मोटारसायकल किंमत ४० हजार रुपये व एक मोबाईल किंमत २५ हजार रुपये असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले असुन अजय दिलीप भोसले यास अटक केली आहे सुनील उर्फ काळ्या श्रावण शिंदे वय वर्षे २१ रा  सुंभा ता उस्मानाबाद दिनेश पंप्या शिंदे वय वर्षे १९ रा. मानमोडी तालुका तुळजापूर हे दोन आरोपी  निष्पन्न झालेले आहेत
ही कारवाई पोलीस अधीक्षक निवा जैन अपर पोलीस अधीक्षक नवनीत कुमार काँवत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी.व्ही. माने पोलीस नाईक चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल कोळी, मारलापल्ले, आरसेवाड , चालक पोलिस कॉन्स्टेबल गोरे यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top