शिक्षक दिनानिमित्त छावा संघटनेच्या वतीने १११
शिक्षक-शिक्षीकांचा सत्कार
उस्मानाबाद :- आज दि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन व छावाप्रमुख- मा.श्री.धनंजयभाऊ (महाराज) जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन उस्मानाबाद जिल्ह्यातील 111 शिक्षक-शिक्षीका यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार छावा संघटना, उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी-प्रा.देशपांडे, प्रा.भोसले,प्रा.पवार,प्रा.पडवळ,प्रा.शितोळे, प्रा.चव्हाण,प्रा.काझी,प्रा.निंबाळकर यांच्यासह उस्मानाबाद मधील विविध शिक्षक व शिक्षिका यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करताना उस्मानाबाद छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश पवार,जिल्हा कार्याध्यक्ष अमोल शिरसाट,
कायदेविषयक सल्लागार- adv. आकाश मगर, adv. योगेश पडवळ, प्रा.आकाश मोरे, स्वप्नील पवार, हर्ष हजगुडे, वैभव करंडे, सचिन कदम, विशाल शिरसाट आदिसह छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.