( बातमी संकलन :- प्रभाकर जाधव )
तामलवाडी:- दि 6 सप्टेंबर रोजी सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष जाधव प्रमुख पाहुणे त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव तथा तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत अण्णा लोंढे ,पर्यवेक्षक गणेश हलकरे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संस्थेचे सचिव यशवंत आणाल लोंढे यांनी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान केला प्राचार्य सुभाष जाधव व पर्यवेक्षक गणेश हलकरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . तर सामाजिक अंतर ठेवून चंद्रकांत साळुंखे यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन चरित्र व शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले . यावेळी ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे ,चंद्रकांत साळुंखे , चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, सुहास वडणे ,महादेव मसुते, महादेव माळी , विनोद कुंभार , प्रशांत चुंगे , बालाजी साठे ,लक्ष्मण पाटील, गिरीश जाधव ,योगेश राऊत, श्री गणेश स्वामी ,बालाजी रणसुरे, दत्तू कोकरे ,सुनील पाटील, महिला शिक्षिका शाहिदा पिरजादे , मनिषा गिरे, मनीषा सावंत विठाबाई पाटील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुहास वडणे यांनी तर सर्व उपस्थितांचे योगेश राऊत यांनी आभार मानले या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.