राज्यात 2 ते 3 दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला आहे . सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन वेगवेगळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे . दोन्ही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होतं असल्याने याचा मान्सूनवर परिणाम झाला आहे . आज राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे . हवामान खात्याने आज नाशिक , धुळे , जळगाव , नंदुरबार , औरंगाबाद , अहमदनगर , बीड , बुलडाणा , जालना , परभणी , नांदेड , हिंगोली , वाशीम , अकोला , अमरावती , यवतमाळ , वर्धा , चंद्रपूर , नागपूर , भंडारा , गोंदिया आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे . काल अकोल्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं . अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारी केरळात धुव्वाधार पाऊस कोसळला आहे . यामुळे केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे .
आज 22 जिल्ह्यांना हाय अलर्ट - High alert rain to 22 districts
ऑक्टोबर १७, २०२१
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा