७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली

0

तुळजापूर :- शहरातील वासुदेव गल्ली  येथील एका 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवण्याची घटना तुळजापूर शहरात घडली आहे .एकाच महिन्यात दुसरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आहे. तुळजापूर शहरात सातत्याने आत्महत्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे .


              याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली  या भागातील शेटीबा रामोजी शिंदे वय 75 वर्ष यांनी दिनाक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी पहाटे 3 ते साडे चार वाजण्याच्या सुमारास दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्याने दारुच्या नशेत स्वतःच्या राहत्या घरी लाकडाच्या आडुला साडीने गळफास घेऊन मयत पावले .याप्रकरणी मुलगा गोविंद शिंदे यांनी दिलेल्या खबरे वरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .

सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय राठोड, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तुळजापूर शहरात होत असलेल्या आत्महत्या सध्या चिंतेचा विषय ठरत आहे .एकाच महिन्यात दुसरी आत्महत्या आहे यापूर्वी वेताळ नगर भागातील एका युवकाने चार ऑक्टोंबर रोजी गळफास घेतली होती त्यानंतर आज पुन्हा 16 ऑक्टोंबर रोजी एकाच महिन्यात दोन आत्महत्यांमुळे शहरात चिंतेचा विषय ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top