तुळजापूर मंदीर संस्थानच्या वतीने पालखी मानकऱ्यांचा सत्कार
तुळजापुर - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या सिमोल्लंघनासाठी बुऱ्हानगर येथील भगत कुंटूबीयांची मानाची पालखी येत असते .
मंदीर संस्थानच्या वतीने पालखीचे मानकरी अॅड . अभिषेक विजय भगत ,कविता भगत ,किरण भगत मनीषा भगत कुणाल भगत ,अजिंक्य भगत ,वैदेही भगत , रोहन भगत ,संकेत यांचा तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर , प्रताधिकारी खरमाटे साहेब ,नगर अध्यक्ष सचिन रोचकरी ,पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके तहसीलदार तांदळे साहेब ,पोलीस निरीक्षक काशीद साहेब ,तहसीलदार कोल्हे मॅडम ,व्यवस्थापक इंतुले आदी उपस्थित होते.