४ हजार कुटूंबांची दिवाळी झाली प्रकाशमान : आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना दिवाळीची भाऊबीज भेट
तुळजापूर : कोरोनाचा कहर अन् त्यात मंदिर दीर्घकाळ बंद राहिल्याने तुळजापुरातील हजारो कुटूंबियांच्या झालेल्या हाल-अपेष्टा... पुन्हा त्यात अतिवृष्टीच्या रुपाने कोसळलेले संकट... आर्थिक चणचणीने त्रस्त झालेले हजारो कुटूंब व त्यांच्या चेहर्यावर दिवाळी साजरी करायची कशी, ही चिंता. नेमकी हीच अडचण जाणून घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या वाढदिनी हारतुर्यांना फाटा देत गरजूंना मदत करण्याबाबत आवाहन केले होते. त्यास लागलीच प्रतिसाद देत तुळजापुरातील पदाधिकार्यांनी तब्बल ४ हजार कुटुंबियांना दिवाळी साहित्य व फराळाची भाऊबीज भेट देत शुक्रवारी त्यांच्या कुटूंबांत आनंदाचे दीप उजळविले.
--------------------------------------------------------
--------------------------------------------------------
तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा ३० ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. मात्र, यावेळी विविध रुपाने आलेल्या आपत्तीने शेतकरी, व्यवसायिक व अन्य सामान्यजन अडचणीत असल्याने त्यांनी वाढदिवस हारतुर्यांनी साजरा करण्याऐवजी तो गरजूंना मदत देऊन करण्याचे निश्चित केले. तसे आवाहनही त्यांनी हितचिंतकांना केले होते. त्यास प्रतिसाद देऊन प्रियंका विजयकुमार गंगणे, अनिता सज्जनराव साळुंके, नरेश अमृतराव, औदुंबर कदम, माऊली भोसले, किशोर साठे, विजय गंगणे, चंद्रकांत (बापू) कणे, मनोज गवळी, अर्चनाताई गंगणे, संध्या आण्णासाहेब कणे यांनी पुढाकार घेत शुक्रवारी तब्बल ४ हजार गरजू कुटूंबियांना दिवाळीत लागणारे साहित्य व फराळ आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते वाटप करीत त्यांच्या घरी आनंदाचे दीप उजळण्याचे काम केले. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक पंडितराव जगदाळे, विजय कंदले, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, नागेश नाईक, राजामामा भोसले, सुहास साळुंके, शिवाजीराव भोसले, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे, प्रकाश मगर, विशाल छत्रे, प्रिया गंगणे, हेमाताई कदम, शारदा भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरडोई उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न : पाटील
तुळजापुरात भाऊबीज भेट वाटप कार्यक्रमात बोलताना आ. पाटील म्हणाले, तुळजापूर शहरातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. तुळजापुरात भाविकांची संख्या वाढून ते येथे रहावेत, खर्च करावेत यासाठी पर्यटन विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र शासनाच्या प्रशाद योजनेतून हा विकास साधण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत. तसेच रेल्वेमार्गासाठी केंद्र शासन सकारात्मक आहे. तो लवकर पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहोत. राज्याने त्यांचा अर्धा वाटा द्यावा, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास या भागाचा कायापालट होऊन विकासाला गती मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
नको हार-तुरे, पेटवा मदतीचे दिवे...
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना महामारी तसेच अतिवृष्टीने संकट उभे केले आहे. कोरोनाने अनेकांच्या कुटूंबातील जीवाभावाचे सदस्य मृत्युमुखी पडले. शेतकरी आर्थिक संकटात आहे. छोटे व्यवसाय कोलमडले आहेत. अशा स्थितीत वाढदिवस साजरा करणे उचित वाटत नाही. तेव्हा हितचिंतकांनी हार, गुच्छ, भेटवस्तू, बॅनर्स यावर खर्च न करता आपल्या जवळच्या गरजू कुटूंबांना मदत करावी, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.