उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी ४२ छापे
उस्मानाबाद जिल्हा : जिल्हाभरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसावा या हेतूने मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांच्या मार्गदर्शनातून दोन दिवस अवैध मद्य विरोधी मोहिम राबवली जात आहे. यात मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी -काल दि. 27.10.2021 रोजी खालील प्रमाणे 42 छापे टाकले. या छाप्यांत पिंपांमध्ये आढळलेला हातभट्टी मद्य निर्मीतीचा सुमारे 8,360 लि. द्रव पदार्थ पोलीसांनी घटनास्थळीच ओतून नष्ट केला. तर दारु जप्त करुन साहित्यासह 551 लि. हातभट्टी दारु व 781 बाटल्या देशी- विदेशी दारु जप्त करुन संबंधीतांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 42 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात नोंदवले आहेत.
1) उमरगा पोलीसांनी 6 ठिकाणी छापे टाकले असता पळसगाव साठवण तलावाच्या बाजूस गोपीचंद राठोड, राजु राठोड, आबु राठोड, संजय चव्हाण, संजय राठोड, निळकंठ राठोड, संजय राठोड हे तीन ठिकाणी हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 840 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात व 45 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले. तसेच माडज येथील तलावाजवळ ज्ञानोबा काळे हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी- विदेशी दारुच्या 23 बाटल्या बाळगलेले, बलसुर येथील महावितरण कार्यालयाजवळ माधव चव्हाण हे देशी- विदेशी दारुच्या 32 बाटल्या बाळगलेले व शास्त्रीनगर, उमरगा येथे मधुकर लोहार हे 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.
2) मुरुम पोलीसांनी 5 ठिकाणी छापे टाकले असता दाळींब येथे अंबाजी सातपुते, दगडू सातपुते, संदीप सुरवसे हे तीघे आपापल्या घरासमोर एकुण 94 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, सुंदरवाडी येथील हॉटेलसमोर राजेंद्र मुल्ला हे देशी- विदेशी दारुच्या 13 बाटल्या बाळगलेले व मरीआई चौक, येणेगुर येथे भास्कर येडगे हे 18 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.
3) येरमाळा पोलीसांनी 4 ठिकाणी छापे टाकले असता येरमाळा येथील बँकेजवळ आश्विनी शिंदे व बरमाचीवाडी येथील मोहा रस्त्यालगत राजेंद्र काळे असे दोघे हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 600 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात व 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, उंबरापाटी येथे सिमाबाई शिंदे या 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या, वाघोली, ता. कळंब येथील हळदगाव रस्त्यालगत अक्षय कदम हे देशी दारुच्या 80 बाटल्या बाळगलेले आढळले.
4) परंडा पोलीसांनी 3 ठिकाणी छापे टाकले असता माणकेश्वर येथे सचिन पाटील व बारीक जाधव हे दोघे देशी दारुच्या 192 बाटल्या बाळगलेले, परंडा येथील एका ढाब्यासमोर शब्बीर शेख हे 50 लि. हातभट्टी दारु बाळगलेले व ढगपिंप्री येथील किराणा दुकानासमोर सज्जन खर्चे हे देशी दारुच्या 12 बाटल्या बाळगलेले आढळले.
5) तुळजापूर पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता तुळजापूर पर्यायी रस्त्याजवळील शेडमागे देशी- विदेशी व बियरच्या अशा एकुण 44 बाटल्या बाळगलेले व डॉ. आंबेडकर चौकात महेश गायकवाड हे देशी दारुच्या 100 बाटल्या बाळगलेले आढळले.
6) कळंब पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता कळंब औद्योगिक वसाहत परिसरात हिराबाई काळे व लालाबाई काळे या दोघी वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 2,200 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात व 70 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या व कळंब बस स्थानकाजवळ शालन काळे या देशी- विदेशी दारुच्या 5 बाटल्या व 35 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या.
7) शिराढोन पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता घारगाव लमाण तांडा येथे रामभाऊ पवार व जनक राठोड हे दोघे हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ- पाणी मिश्रणाचा एकुण 600 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात व 70 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.
8) बेंबळी पोलीसांना कनगरा शिवारातील तुळजाभवानी हॉटेमध्ये शोभा पवार या 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या.
9) वाशी पोलीसांना पारगाव परिसरात एका बिअरबारच्या मागे अरुण पवार हे 8 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.
10) लोहारा पोलीसांनी 4 ठिकाणी छापे टाकले असता पेठसांगवी येथे दत्तु कोकणे हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 30 बाटल्या बाळगलेले, जेवळी (उ.) येथे अस्लम शेख हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 18 बाटल्या बाळगलेले, कानेगाव येथे गोरोबा सुरवसे हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 30 बाटल्या बाळगलेले व लोहारा येथील स्मशानभुमीजवळ शफी अत्तार हे देशी दारुच्या 27 बाटल्या बाळगलेले आढळले.
11) भुम पोलीसांना पारधी पिढी, भुम येथे आशाबाई काळे या हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ- पाणी मिश्रणाचा 220 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात बाळगलेल्या आढळल्या.
12) उस्मानाबाद (श.) पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता इंदीरानगर येथे मिना काळे या 65 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या व वडगाव (सि.) येथे सिध्देश्वर पांढरे हे देशी- विदेशी दारुच्या 34 बाटल्या बाळगलेले आढळले.
13) अंबी पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता वडगाव (नळी) येथे भरत वाकळे हे देशी दारुच्या 35 बाटल्या व हिंगणगाव (खु.) येथे सचिन गायकवाड हे देशी दारुच्या 48 बाटल्या बाळगलेले आढळले.
14) तामलवाडी पोलीसांना पिंपळा (खु.) येथील एका ढाब्याच्या मागे जितेंद्र धनके हे देशी- विदेशी व बियरच्या अशा एकुण 30 बाटल्या बाळगलेले आढळले.
15) उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या पथकास राजेश नगर पारधी पिढी, ढोकी येथे रंजना चव्हाण, तोळाबाई चव्हाण, शारदा चव्हाण, संगिता चव्हाण, लाला चव्हाण हे सर्वजण हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ- पाणी मिश्रणाचा 3,300 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात बाळगलेले आढळले.
16) नळदुर्ग पोलीसांना येडोळा तांडा येथील खंडाळा नदी पात्रात रवि राठोड हे हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ- पाणी मिश्रणाचा 600 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात बाळगलेले व फुलवाडी तांडा येथे चिलेश जाधव हे आपल्या घरासमोर देशी- विदेशी व बियरच्या अशा एकुण 28 बाटल्या बाळगलेलेआढळले.
17) उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना सकनेवाडी येथे हिराबाई काळे या आपल्या घरासमोर 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या.
17) आनंदनगर पोलीसांना रामनगर सांजा रोड, उस्मानाबाद येथे नरेश काळे हे 26 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.