उस्मानाबाद जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांना स्वच्छता आणि परवाने बंधनकारक : नियमांचे पालन न केल्यास अन्न व औषध प्रशासन करणार कारवाई
उस्मानाबाद,दि.28(जिमाका): जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांनी दुकानांत स्वच्छता राखणे आवश्यक आहे . तसेच परवाने घेनेही बंधनकारक आहे .जे मिठाई विक्रेते नियमांची पालन करणार नाहीत त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागातर्फे कारवाई करण्यात येईल असा इशारा येथील अन्न सुरक्ष व औषध प्रशासनचे आयुक्त शि. ब . कोडीगिरे यांनी दिला आहे.स्वच्छता परवाना व नोंदणीसाठी http://foscos.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार सुट्या (लूज) स्वरूपात विक्रीसाठी प्रदर्शित केलेल्या भारतीय पारंपरिक मिठाई या अन्न पदार्थाच्या ट्रे किंवा कंटेनरवर बेस्ट बिफोर दिनांक टाकणे बंधनकारक केले आहे. तसेच मिठाई व्यवसायिकांना नोटीस बोर्डवर मिठाईचे स्वरूप (घटक पदार्थ)प्रदर्शित करणे आवश्यक आहे.ही बाब व्यापक ग्राहक हिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक व बंधनकारक आहे.
सर्व मिठाई विक्रेत्यांनी या तरतुदीचे पालन करावे.जे व्यावसायिक या तरतुदीचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यासाठी उस्मानाबाद कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी प्र.शा.काकडे यांच्या अधिपत्याखाली भरारी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील सर्व मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी आस्थापनेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा, मिठाई उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक खवा आणि इतर घटक पदार्थ परवाना व नोंदणी धारक आस्थापनांकडूनच खरेदी करावेत आणि त्याची खरेदी बिले जपून ठेवावी.अशा प्रकारे ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीन सर्व मिठाई व्यावसायिकांना सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे,असेही आवाहन श्री . कोडिगिरे यांनी केले आहे.