गरजूंना मदत करून आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस साजरा करावा : नितीन काळे
जिल्हयाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी असुन हा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी धाराशिव यांच्या वतीने पदाधिकारी, कार्यकर्ते व शुभचिंतकांना करण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या काळात, लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक संकटात सापडलेली आहे. त्यातच शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गीक संकटाचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांसह सामान्य नागरीकांना बसलेला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना व कोरोना महामारी मध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजू कुटुंबीयांना मदत करुन आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सामाजिक उपक्रम राबवून तसेच गरजूंना मदत करून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे छायाचित्रे (फोटोज) 8888627777 या व्हाट्सएप नंबर वर पाठविणे .
याच आपणाकडून आ. राणाजगजितसिंह पाटील यांना वाढदिवसाच्या अमूल्य शुभेच्छा असतील.
त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शुभचिंतक यांनी हा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करुन, गरजू कुटुंबाना मदत करुन साजरा करावा असे आवाहन भाजपा धाराशिवचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.