भाजपा उस्मानाबादच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
उस्मानाबाद :- प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी वतीने भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन अध्यक्ष श्री शशिकांत खुने उपाध्यक्ष श्री धर्मराज सुर्यवंशी सचिव श्री दत्तात्रय साळुंके कार्याध्यक्ष श्री डॉ.शतानंद दैठणकर संघटक श्री निशिकांत खोचरे कोषाध्यक्ष श्री विकास जाधव प्रसिद्धी प्रमुख श्री अशोक गुरव, मनोज शेलार मिडीया प्रमुख श्री दत्ता जावळे, नितीन वीर, प्रवक्ता रियाज शेख, कायदेशीर सल्लागार अॅड. श्री प्रशांत जगदाळे या सर्वांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवणारी तसेच महाराजांचे सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम निःपक्षपाती पणे साजरी करणारी समिती म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा समिती उस्मानाबाद म्हणूनच समितीचे नाव पुढे येते, व्यसनमुक्त समाज घडविणे, वर्गणीमुक्त उत्सव साजरे करणे असे अनेक प्रकारचे चांगले उपक्रम राबविणारी समिती ही शिवराज्याभिषेक सोहळा समिती आहे .
या सत्कारप्रसंगी जिल्हा समनव्यक नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रवीण सिरसाठे, भाजप नेते विनोद गपाट, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, नगरसेवक प्रवीण पाठक, तालुका सरचिटणीस नामदेव नायकल, लक्ष्मण माने, अमोलराजे निंबाळकर, संदीप इंगळे, गणेश एडके, पोपिन भोसले, तेजस सुरवसे, सागर दंडणाईक, गुंडोपंत जोशी गुरूजी, आबा सुरवसे, सुरज ढेरे, संतोष शेलार, अजय कोळगे, समर्थ मुंडे, महमूद शेख, वैजिनाथ मोरे, संजय बागल, बाबासाहेब गायकवाड, माऊली देशमुख व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.