हजरत ख्वाजा हामीदअली शहा यांच्या उर्स उत्साहात संपन्न
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हजरत ख्वाजा हामीदअली शहा दर्गा येथे ईद-ए-मिलादून्नबी निमित्त साजरा करण्यात येणारा उरूस महोत्सव उत्साहात संपन्न झाला. उरूस निमित्ताने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातुन तसेच कर्नाटक भागातील भाविक कळंब येथील हजरत ख्वाजा हामीदअली शहा यांच्या दर्ग्यात दर्शनासाठी येतात. कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षे उरूस महोत्सवात भाविकांना सहभागी होता आले नव्हते. यंदाच्या वर्षी राज्य सरकारने कोविड नियमात सूट दिल्याने मोठ्या प्रमाणात भाविक उरूस महोत्सवात सहभागी झाले होते. सर्व कोरोना नियमांच्या अधीन राहून पारंपरिक पद्धतीने उरूस उत्सव संपन्न झाला आहे.
तीन दिवस चालणाऱ्या उरूस उत्सवात पहिल्या दिवशी रात्री चिराग( दिव्यांची माळ ) हा विधी कार्यक्रम असतो तसेच रात्री समाखानी हा कव्वालीचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हजरत ख्वाजा हामीदअली शहा यांचे चिरंजीव आस्ताना-ए-अलियाचे सज्जादानशीन डॉ. शहा जाकीर हामीदअली शहा यांच्या प्रवर्चनाचा कार्यक्रम असतो तसेच दिवसभर धार्मिक कार्यक्रम व आलेल्या भाविकांना 24 तास लंगर पद्धतीने जेवण दिले जाते. तसेच तिसऱ्या दिवशी सकाळी पारंपारिक पद्धतीने दुआचा कार्यक्रम होतो त्यानंतर आलेले सर्व भाविक दर्गे मध्ये दर्शन व प्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघतात.
या वर्षीही आकर्षित रोषणाई
उरूस निमित्त हजरत ख्वाजा हामीदअली शहा यांच्या संपूर्ण दर्गा परिसरात डोळे दिपून टाकणारी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे संपूर्ण दर्गा परिसर रोषणाईने उजळून जातो. पारंपरिक कार्यक्रम व आकर्षक रोषणाईमुळे संपूर्ण दर्गा परिसरात निर्माण झालेल्या भाविक वातावरणात आलेले भाविक रमून जातात.
खासदार ओमराजे निंबाळकर यांची उत्सवात हजेरी
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील कळंब येथील प्रसिद्ध दर्गा व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा हामीदअली शहा दर्गा परिसरास आज भेट दिली. हजरत ख्वाजा हामीदअली शहा यांच्या दर्ग्यावर जाऊन आशीर्वाद घेतला. तसेच बाबा हामीदअली शाह यांचे चिरंजीव आस्ताना-ए-आलिया चे सज्जादानशिन डॉ.शाह जाकीर हामीदअली शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी व उपस्थित भविकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासोबत कळंब तालुका शिवसेचे शिवाजी कापसे, प्रदीप मेटे, सचिन काळे उपसरपंच डिकसळ, रुकसाना बागवान, सुलेमान मिर्झा, कळंब राष्ट्रवादी काँग्रेसचे तारीख सलीम मिर्झा, दयावान ग्रुपचे इम्रान मुल्ला, तसेच शेख मोहित पाशा, साजिद काझी, यूसुफ अली शाह ,शाह सलीम चिश्ती, प्रसिद्ध कव्वाली गायक शाह हबीब अजमेरी,रझी सिद्दिकी ,अमन मोमीन, शेख मोहम्मद अली,नसीम फारूकी,मुबीन शेख,खमर शेख, फहाद चाऊस, तौफिक अली सय्यद, बाबा शेख आदींची उपस्थिती होती.