उस्मानाबाद शहरातील असंख्य शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश
उस्मानाबाद :- जिल्हयाचा सर्वांगीन विकास करण्याच्या दृष्टीकोनातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थीत उस्मानाबाद शहरातील बार्शी नाका परिसरातील उंबरे कोठा,पिवळी टाकी, लमानतांडा येथील शिवसेना विभाग प्रमुख शेषेराव बप्पा उंबरे यांच्यासह शाखा प्रमुख बालाजी सवने, संजय राठोड व युवा कार्यकर्ते अर्जून पवार यांच्या सोबत असंख्य शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या प्रसंगी शेषेराव बप्पा उंबरे हे बोलत असताना म्हणाले की, आताची शिवसेना ही पूर्वीची शिवसेना राहीली नसुन जुन्या, एकनिष्ठ शिवसैनिकांना हिंदू –हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रमाणे न्याय देवू शकत नाही त्यामुळे आपण शिवसेनेचा झेंडा खांद्यावरुन काढून भारतीय जनता पार्टीचा भगवा खांद्यावर घेत आहोत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचे सांगीतले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थीतीत शेकडो युवक तसेच महिलांचा भाजपात प्रवेश करण्यात आला. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी भाजपात प्रवेश करणा-या कार्यकर्त्याचे स्वागत करत पक्ष संघटन आणखी प्रबळ करुन शहराच्या विकासात सदैव प्राधान्य देणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. आ. राणादादा यांनी उस्मानाबाद जिल्हयाचा विकास करत असतांना तरुणांच्या हाताला काम मिळणे महिलांना स्वंय रोजगार, गृहउद्योग बचत गटाच्या माध्यमातून आर्थीकदृष्टया सक्षम करणे हे आपले प्रथम ध्येय असल्याचे सांगीतले. तसेच कौडगांव येथील एमआयडीसीमध्ये टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क सारखा हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणारा प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झाला परंतु महाविकास आघाडी सरकारच्या आडकाठी धोरणामुळे अनेक दिवसांपासून रेंगाळत असल्याचेही सांगीतले. तसेच जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग मोदी सरकारने अनेक वर्षांपूर्वी मंजूर केला आहे. या मार्गामुळे उस्मानाबाद शहर ,तुळजापूर येथील तुळजा भवानी देवीचे मंदिर असणा-या देवस्थानास आर्थीक उभारी मिळणार आहे परंतु राज्य सरकारच्या हेकेखोरपणामुळे हा प्रकल्प रेंगाळत असल्याचेही सांगीतले. आपण जो माझ्यावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मी आपले स्वागत करतो व सदैव आपल्या सोबत काम करत राहीन असा विश्वासही व्यक्त केला.
या प्रसंगी अजय उंबरे, सागर पवार,विजय उंबरे, सुधीर उंबरे, सचिन उंबरे, अमोल उंबरे, सनमेश लोढे, सुनित ओव्हाळ, सुजीत उंबरे, विशाल उंबरे, शाहुराज उंबरे, संदीप सुरवसे, विश्वास कसबे, शिवराज औटी, सुमीत ढवळे, बालाजी पांचाळ, सुरेश वाघमारे, पिंटू पांढरे, पिनू कटक, अक्षय तावसकर, अभय ढोबळे, नामदेव चव्हाण यांच्यासह अनेक तरुणांनी व महिलांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रच्या वेळी भाजपाचे सतीश दंडनाईक, विजय दंडनाईक, अशोक उंबरे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, शिवाजी पंगुडवाले, अर्चना अंबुरे, राहुल काकडे, अभय इंगळे, पांडूरंग लाटे, इद्रजीत देवकते, यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.