google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी मारहाण , दोन ठिकाणी जुगार विरोधी कारवाई , मुरुम येथे अवैध मद्य विरोधी कारवाई , उमरगा येथे चोरी गुन्हे दाखल..

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी मारहाण , दोन ठिकाणी जुगार विरोधी कारवाई , मुरुम येथे अवैध मद्य विरोधी कारवाई , उमरगा येथे चोरी गुन्हे दाखल..

0



उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी मारहाण , दोन ठिकाणी जुगार विरोधी कारवाई , मुरुम येथे अवैध मद्य विरोधी कारवाई , उमरगा येथे चोरी गुन्हे दाखल..




मारहान.”

बेंबळी पोलीस ठाणे : धनंजय खंडू क्षिरसागर, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद हे दि. 15 ऑक्टोबर रोजी 16.30 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावकरी- मुन्ना शेाख यांनी त्यांना पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन धनंजय यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावर धनंजय यांनी त्याचा जाब विचारला असता शेख यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावेळी धनंजय यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या आईसही मारहान करुन ढकलून दिल्याने त्या खाली पडून त्यांचा हात मोडला. अशा मजकुराच्या धनंजय क्षिरसागर यांनी दि. 16 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

कळंब पोलीस ठाणे : संजय किशन काळे, रा. इंदिरानगर, कळंब हे राहत असलेल्या घरावरुन गावकरी- दिपक राजेंद्र काळे यांच्यासोबत जुना वाद आहे. यातून दिपक काळे यांसह मिरा काळे, धिरज चव्हाण, राहुल काळे अशा चौघांनी ते घर रिकामे करण्याच्या कारणावरुन दि. 15 ऑक्टोबर रोजी 10.30 वा. सु. राहत्या कॉलनीत संजय काळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच दिपक काळे यांनी संजय यांच्या उजव्या हातावर लोखंडी गज मारुन त्यांच्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या संजय काळे यांनी दि. 16 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


जुगार विरोधी कारवाई.

कळंब पोलीस ठाणे : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पोलीसांनी दि. 16 ऑक्टोबर रोजी शहरात दोन ठीकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत होळकर चौकातील एका पत्रा शेडजवळ अकबर हुसेन तांबोळी, रा. डिकसळ, ता. कळंब हे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 640 ₹ रोख रक्कम बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत छ. शिवाजी महाराज चौक, कळंब येथे अमित सजेंराव गांजेकर हे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 3,000 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 

अवैध मद्य विरोधी कारवाई.

मुरुम पोलीस ठाणे : संतोष धनराज पवार, रा. नाईकनगर हे दि. 16 ऑक्टोबर रोजी गावातील चिंचोली (भु.) रस्त्याकडेला 180 मि.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या 13 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना मुरुम पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

चोरी.

उमरगा पोलीस ठाणे : राजकुमार मारुती सगर,रा. पतंगे रोड, उमरगा यांच्या तुरोरी शिवारातील बांधकामावर मोकळ्या जागेतील 10 व 12 एमएम जाडीची 573 कि.ग्रॅ. वजनाची सळई, 6 एमएम जाडीची 135 कि.ग्रॅ. वजनाची सळई दि. 15- 16 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सगर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top