google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लखीमपुर-खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला उस्मानाबाद शहरात उस्फूर्त प्रतिसाद

लखीमपुर-खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला उस्मानाबाद शहरात उस्फूर्त प्रतिसाद

0




लखीमपुर-खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला उस्मानाबाद शहरात उस्फूर्त प्रतिसाद 


उस्मानाबाद :- केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपच्या योगी सरकारने चिरडून टाकले या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राजवटीचा परिचय भाजप सरकारने करून दिला आहे अशा या क्रूर अत्याचारी भाजप सरकार विरोधात आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बंदला व्यापारी वर्गातून उस्मानाबाद शहरात उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला 
   शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस,शेकाप व मित्र पक्षाच्या वतीने पक्षाच्या प्रमुख  नेत्यांकडून उस्मानाबाद शहरात सकाळी ९ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळा मारुती चौक ,नेहरू चौक, देशपांडे स्टॅन्ड,खाजा नगर, बार्शी नाका, समता कॉलनी परिसरात फिरून बंदचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला शहरातील सर्वच व्यापार्‍यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून आपली दुकाने बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद दिला 
   छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र परिवाराच्या वतीने भाजप सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला यावेळी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख कैलास घाडगे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर जिल्हा काँग्रेसचे संघटक राजाभाऊ शेरखाने , माजी नगरसेवक खलील सय्यद , राष्ट्रवादीचे मसुद शेख , राष्ट्रवादी युवतीच्या सक्षणा सलगर यांनीही आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटार सायकलची रॅली काढून उस्मानाबाद शहरातून बंदचे आवाहन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली .

   यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,सोमनाथ गुरव ,प्रवीण कोकाटे, बाळासाहेब काकडे ,नितीन शेरखाने , रवि कोरे ,बंडू आदरकर ,राष्ट्रवादीचे आदित्य गोरे , मंजुषा मगर , नंदकुमार गवारे , आयाज शेख , सचिन तावडे , नितीन बागल , गणेश खोचरे ,विशाल शिंगाडे , अन्वर शेख , रणविर इंगळे , सागर चव्हाण , लतीफ पटेल , 

काँग्रेसचे लक्ष्मण सरडे , प्रशांत पाटील ,अग्निवेश शिंदे ,सिद्धार्थ बनसोडे, दादा पाटील ,जावेद काझी ,उमेश राजेनिंबाळकर ,विश्वजीत शिंदे, रोहित पडवळ, दर्शन कोळगे ,धनंजय राऊत ,देवानंद एडके ,मेहराज शेख, बापू शेळके ,बाबा पाटील ,प्रभाकर लोंढे , स्वप्नील शिंगाडे ,अभिजीत देडे , गणपती कांबळे , प्रेमानंद सपकाळ, गणेश सापते , अतिफ काझी , तीन्ही पक्षाचे इतर पदाधिकारी , कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top