हातोला पाझर तलावाला जागोजागी तडे, निकृष्ट कामामुळे बंधारा धोक्यात! , तलावावर आमरण उपोषणाला सुरेश इंगोले यांचा प्रारंभ

0


हातोला पाझर तलावाला जागोजागी तडे, निकृष्ट कामामुळे बंधारा धोक्यात, तलावावर आमरण उपोषणाला सुरेश इंगोले यांचा प्रारंभ


वाशी :- 
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सचिन इंगोले यांनी पाझर तलावाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्यामुळे परिसरातील शेती धोक्यात आल्याचा ठपका ठेवून प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला असता सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे या दुर्लक्षाचा भूमिके विरुद्ध सुरेश इंगोले यांनी हातोला पाझर तलावावर अमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.

 प्रशासनाने आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष सचिन इंगोले यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ बाजार तलावाला गेलेल्या तड्याची खातरजमा करून तात्काळ उपाय योजना करावी अन्यथा खूप मोठा अनर्थ होणार आहे.


येथील साठव तलावाची गळती थांबावी म्हणून गेली तीन दिवस वाशी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री सचिन इंगोले उपोषणासाठी बसले आहेत.संबधित पाझर तलावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जेचे झाले असुन शेतकऱ्यांना जमिनी या साठवण तलावासाठी दिलेल्या आसताना संबधित शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मावेजा मिळालेला नाही, या तलावातील पाण्याचा उपयोग परिसराला होत नसल्याचा नागरिकांनी नागरिकांनी सांगितले . हातोला पाजर तलाव दुरुस्ती तातडीने होण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष सचिन इंगोले उपोषणाला बसले असतील तर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना या प्रश्नावर सहकार्य केले पाहिजे अशी जिल्ह्यातील नागरिकांची लोकभावना आहे.
पावसाळ्यात हे तलाव तुडुंब भरलेले आहे पण शेतकऱ्यांना शेतीसाठी उन्हाळ्यात या तलावाच्या पाण्याची गरज भासते पण या तलावाचे काम अत्यंत निकृष्ट झालेले असुन यामुळे तलावला जागोजागी भेगा पडल्या आहेत त्यामुळे या धरणातुन पाण्याची गळती सुरु आहे यामुळे ऐन उन्हाळी दिवसात हे तलाव रिकामे होत आहे यामुळे येथील शेतकऱ्यांना हे धरण आसताना ही कोणताही फायदा होत नाही.

या धरणाची गळती तात्काळ थांबवावी,ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणात शासनाने संपादित केल्या आहेत त्या शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा मिळावा तसेच या कामातातील जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी सचिन इंगोले यांनी या धरणावरच उपोषण सुरु केले आहे.

छाया राहुल कोरे आळणीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top