तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात 400 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार
तुळजापूर :- डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन मंगळवार दि.16 नोव्हेंबर २०२१ रोजी, मौजे होर्टी ता.तुळजापुर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा होर्टी व परिसरातील सर्व वयोगटातील 400 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रतिमा पुजन व दिप प्रल्वलन सौ.अस्मिता ताई कांबळे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हसते पार पाडले. यावेळी सौ.रेणुकाताई इंगोले प.स.सभापती तुळजापुर, श्री महादेव पाटील, गणेश सोनटक्के माजी जि.प.सदस्य, सरपंच सुवर्णाताई गुंड, भिवा इंगोले, शरद भोसले, दादा जाधवर, दत्तात्रय राजमाने, बाळु मुळे, दत्ता राजमाने, रामन्ना स्वामी, धन्नय्या स्वामी, गणेश खराडे, शिण्णाप्पा भुंजीटे, निळु राजमाने, वैभव राजमाने, प्राथमीक उपकेंद्राचे डॉ.परवारी व सर्व आशा कार्यकत्या व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षक व शिक्षीका मोठया प्रमाणात नागरीक उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.परवीन सय्यद, डॉ.जय गोयल, डॉ.आयुष गुप्ता, डॉ.राजेश चोंडेकर, डॉ.सिध्दांत रेलेकर, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नाना शिंदे, संदीप चव्हाण, रवी शिंदे, पवन वाघमारे, वैभव रेडे ईत्यादींनी परीश्रम घेतले.