पत्रकार गिरीश भगत यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर
लोहारा/प्रतिनिधी
स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पत्रकारिता क्षेत्रातून लोहारा येथील पत्रकार गिरीश भगत यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य, अंधश्रद्धा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. उमरगा येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून दि.२८ नोव्हेंबर ला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात पत्रकारिता क्षेत्रातून लोहारा येथील पत्रकार गिरीश भगत यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि.२८ डिसेंबर ला उमरगा येथे होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे व्याख्यानही होणार आहे अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संजय वैरागकर, सदस्य सूर्यकांत वैरागकर व गिरीजाकांत वैरागकर यांनी दिली आहे.