वीज बिलाची रक्कम सक्तीने वसुली न करणे बाबत वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0

उस्मानाबाद जिल्ह्यातील वीज बिलाची रक्कम सक्तीने वसुली न करणे बाबत वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

उस्मानाबाद दि. 30 (प्रतिनिधी )  सविस्तर वृत्त असे की , अचानक  झालेल्या पावसामुळे सोयाबीन पीक शेतकऱ्याच्या हाती लागले नाही .  शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला पिक विमा अद्यापि मिळालेला नाही . त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना महावितरण कंपनी सध्या कोणतीही सूचना देत होता  शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम चालू आहे .आता शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला असताना तसेच सध्या गहू व ज्वारी या पीकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पन्नात घट येऊन शेतकऱ्यांचे मोठे  नुकसान होऊ शकते याचा विचार करता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वीज पंपाची सक्तीने विना सुचना देता वीज कनेक्शन तोडणे थांबवून त्यांच्या कडून हप्त्या -हप्त्याने वसुली करून बीले भरणा करण्याची परवानगी द्यावी अशा स्वरूपाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावर महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा एडवोकेट जीनत प्रधान , जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव , जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट  एल .जी . खुणे , सह सचिव सोमनाथ नागटिळक,  एडवोकेट मारुती शिंदे,  एडवोकेट एस बी कांबळे,  विजय बनसोडे, रोहित गायकवाड , आदी च्या  सह्या आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top