विलनिकरणाच्या मागणीसाठी कळंब एस.टी. पुन्हा थांबली... विडियो बातमी..
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलनिकरण करा या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांनी राज्य भर पुकारलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा देत कळंब एस.टीचे कर्मचारी देखील आज पासून पुन्हा बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे काही काळ सुरळीत झालेली कळंब आगारातील एस.टी. सेवा पुन्हा थांबली आहे.
मागील अनेक दिवसांपासून रा.प. कर्मचारी महाराष्ट्र भर आंदोलन करत आहेत. त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात मूलभूत गरजा भागवणे देखील शक्य होत नाहीत. यामुळेच आता पर्यंत ३७ च्या आसपास राप कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे राज्य शासनात विलीन करून सर्व वेतन भत्ते व इतर सवलती राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन कर्मचाऱ्यांच्या वतीने विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय उस्मानाबाद यांना देण्यात आले आहे.