जागतिक अपंग दिनानिमित्त उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने नोंदणीकृत अपंग बांधवांना निधीचे वाटप

0






जागतिक अपंग दिनानिमित्त उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने नोंदणीकृत अपंग बांधवांना निधीचे वाटप 

उस्मानाबाद :- जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील नोंदणीकृत अपंग बांधवांसाठी २२ लाख ९० हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्याचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.

     शासनाच्या परिपत्रकानुसार विकास निधीच्या ३ टक्के स्वनिधी अपंग बांधवांना वितरित करण्यात यावा या परिपत्रकानुसार उस्मानाबाद नगरपरिषदेने आमदार कैलास पाटील, उस्मानाबाद-कळंब विधानसभा संपर्कप्रमुख अरुण नारकर, नगर परिषदेचे अध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे व अपंग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला.

 नगरपालिकेने आपल्या  स्वनिधीमधून २२ लाख ९० हजार रुपयांच्या निधीचे वाटप 3 डिसेंबर 2021 रोजी उस्मानाबाद नगर परिषद येथील अध्यक्षांच्या दालनामध्ये कार्यक्रम  घेऊन उपस्थित अपंग बांधवांना पत्र देऊन निधीचे वितरण करण्यात आले.

      उस्मानाबाद  शहरातील 458 नोंदणीकृत अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी 5000/- (पाच हजार) रुपये प्रमाणे धनादेशाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात आला. उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने अपंग बांधवांसाठी आत्तापर्यंत वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे व यापुढेही असेच कार्य व उपक्रम आयोजित व्हावेत अशी अपेक्षा नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर ( नंदुराजे निंबाळकर ) व्यक्त केली..

सदर कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय (बापु) सस्ते, तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमानी, नगरसेवक तथा गटनेते सोमनाथ गुरव, बांधकाम सभापती प्रदिप घोणे, नगसेवक राणा बनसोडे, शिवसेना शहरप्रमुख संजय मुंडे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, उपशहरप्रमुख तुषार निंबाळकर, युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे व उस्मानाबाद शहरातील नोंदणीकृत अपंग बांधव तसेच नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top