google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जानेवारीला

यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जानेवारीला

0



उस्मानाबाद / प्रतिनिधी-
श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर  यांचा राज्याभिषेक दिन सोहळा ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता किल्ले वाफगांव, राजगुरूनगर, ता.खेड, जि.पुणे येथे संपन्न होणार असल्याची माहिती होळकर परिवारांचे वंशज भूषण होळकर यांनी दिली.


६ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या राज्याभिषेक सोहळा कार्यक्रमानिमित्ताने किल्ले वाफगाव येथे ग्रामदैवता दर्शन मंगलवाद्याच्या गजरात मिरवणूकीस प्रारंभ, राजराजेश्वर मंदिरामध्ये अभिषेक, वाफगाव ग्रामस्थांद्वारे गडपूजन, किल्ल्याच्या मुख्यद्वारावर ध्वजारोहन, राणी महाल प्रांगणात मर्दानी खेळ, राज सदरेकडे प्रस्तान व स्वागत, होळकर राजपरिवार व शहीद जवान यांच्या कुटुंबायांच्या हस्ते राज्याभिषेक मेंढपाळ व शेतकरी बांधव, सरदार वशंज यांच्या हस्ते तळीभंडार, विशेष सेवा पुरस्कार वितरण आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन होळकर राजपरिवारातील भुषण होळकर यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top