लोहारा :- शहरात महाराष्ट्र माळी समाज महासंघ व महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा अशोक माळी होत्या. यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जि.प.सदस्या मिरा अविनाश माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोहारा येथील वि.का.सोसायटीवर माळी समाजाचे राम क्षीरसागर व सुनंदा क्षीरसागर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माळी समाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश माळी, सलीम शेख, दिपक रोडगे, सुग्रीव क्षीरसागर, वसंत माळी, मधुकर भरारे, अशोक दुबे, श्रीनिवास माळी, अशोक माळी, सोमनाथ भोजने, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, शामल माळी, सुजाता क्षीरसागर, मंगल क्षीरसागर, गितांजली क्षीरसागर, महादेवी फुलसुंदर, रुतुजा फुलसुंदर, वैष्णवी क्षीरसागर, आर्या फुलसुंदर, श्रध्दा क्षीरसागर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, तानाजी घोडके, संजय काटे, संदीप माळी, शरण फुलसुंदर, संतोष क्षीरसागर, विष्णू क्षीरसागर, दत्ता माळी, शंकर माळी, बालाजी माळी, अशोक क्षीरसागर, बंटी माळी, यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
जानेवारी ०३, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा