कोंडमध्ये शेकडो कार्यकरत्यांचा राष्ट्रवादीत होणार जाहिर प्रवेश !

0
उस्मानाबाद /प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत उस्मानाबाद तालुक्यातील शिवसेनेचे गाव म्हणून ओळखले जाणारे कोंड हे गाव आहे या गावात अनेक दिवसांपासून शिवसेनेचा भगवा पडकतोय हे गाव शिवसेनेचं गावं म्हणून ओळखल जातय त्यातच ग्रामपंचायत मध्ये काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही यावेळी शिवसेना फडकायला मदतीचा हाथ दिला होता व या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळून ग्रामपंचायत वर वर्चस्व निर्माण केले मात्र गावात कळीचं  राजकारण सुरू झाल्यामुळे नेमका कोण कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हे समजत नसल्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन नाराजीचा सूर दिसतंय त्यामुळे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधण्यास इच्छुक असल्याची कुजबुज गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे  इतर पक्षाला धक्का देत राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा जोरात फिरणार  असल्याचे चित्र दिसतय शिवसेनेचा गड म्हणून ओळखले जाणारे  हे कोंड गाव आहे उस्मानाबाद तालुक्यातील या गावावर कित्येक वर्षापासून शिवसेनेची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे मात्र या येणार्या  पंचवार्षिक निवडणुकीत काय होणार याकडे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमधून आनंदाचा सूर निघत आहे तसेच कोंड गावामध्ये राष्ट्रवादीची शाखा उघडणार असून शेकडो कार्यकर्ते राज्यमंत्री संजय बनसोडे ,कु.सक्षेणाताई सलगर ,सुरेश पाटील ,सुरेश बिराजदार  यांच्या उपस्थितीमध्ये कोंड गावात भव्य अशा शाखेचे उद्घाटन करून दणदणीत  प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

*सोबत काही पैलवान मंडळीही राष्ट्रवादीचं घड्याळ हाथात बांधणार !

कोंड गावची ओळख पैलवान म्हाणूनही आहे त्यामुळे या गावात मल्लांचा आकडा मोठा आहे काही पैलवान मंडळीही राष्ट्रवादीच घड्याळ हाथात बांधणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला कोंडमध्ये अच्छे दिन येणार असल्याची प्रतिक्रीया एका पैलवानाने आमच्याशी बोलना दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top