उस्मानाबाद :- राष्ट्रमाता जिजाऊ यांचे विचार, आचार व संस्कार सध्याच्या पिढीमध्ये रुजवण्याचे काम मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत असुन ही बाब अत्यंत कौतुकास्पद असून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित लसीकरण मोहीम ही अभिनंदनीय आहे असे ही मत उस्मानाबाद जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले - डंबे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार , तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे व शिक्षणविस्तार आधिकारी दैवशाला हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या या दिनी समितीने लसीकरण मोहीम घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आहे प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टींग वापर करून प्रत्येकाने या कोरोना महामारीचा बिमोड करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे ही आवाहन करुन समितीला यापुढे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी रुपाली आवले - डंबे यांनी दिली.
जिजाऊंचा त्याग लक्षात घेऊन प्रत्येक माता-भगिनी त्यांचा इतिहास घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगितला पाहिजे किंवा शिकवला पाहिजे असे मत गट शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी व्यक्त केले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे उपक्रम हे नेहमी चैतन्यमय वातावरण निर्माण करणारे असून व मनोधैर्य वाढविणारे आहेत. अशा या उपक्रमांमध्ये शिक्षण विभागाचा सहभाग सर्वतोपरी राहील अशी ग्वाही यावेळी रोहिनी कुंभार यांनी दिली.
समितीने असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजामध्ये एक नवीन पायंडा पाडत असून अशा उपक्रमामुळे समाजामध्ये एक प्रकारचे एकत्रीकरण होत आहे अशा या उपक्रमाच्या व आयोजन समितीच्या पाठीशी खंबीरपणे प्रत्येकाने उभे राहावे असे मत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर भाषणात समितीचे कार्याध्यक्ष आभिलाष लोमटे यांनी कार्यक्रम आयोजानामागची भूमिका व आगामी काळात समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल देशमुख व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अँड. मनीषा राखुंडे यांनी केले. या वेळी जवळपास 342 लोकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष राम दशरथ मुंडे, कार्याध्यक्ष आभिलाष लोमटे, उपाध्यक्ष डाँ वसुधा दापके देशमुख, संभाजी फरताडे, कोषाध्यक्ष अँड.कुलदीपसिंह भोसले, महिला समन्यवक अँड. मनिषा राखुंडे, डाँ. वृंदाराणी विधाते, संगीता पाटील, जगदीश जोशी, अशिष मोरे, विशाल पाटील, वैभव मोरे, मंगेश भुजबळ, रोहन बावणे, प्रशांत गुरव,शिवाजी चव्हाण, अमोल घार्गे, अमोल पडवळ,विधी सल्लागर नितीन भोसले, अविनाश गरड, नितीन काळे, धनंजय रणदिवे,प्रशांत पाटील, मुख्याध्यापक प्रदीप गोरे, उमेश राजेनिंबाळकर राजसिंहा राजेनिंबाळकर, भालचंद्र कोकाटे,अनंत जगताप, बलराज रणदिवे, रोहित पडवळ, अग्निवेश शिंदे, मिनल काकडे, डॉ. अविनाश तांबारे,अभिराम पाटील, ओम नाईकवाडी, स्वप्नील नाईकवाडी, स्वप्नील पाटील, अमरसिंह गोरे, देविदास पाठक, अमित उंबरे, वैभव उंबरे, कुणाल निंबाळकर, विष्णू इंगळे, अमोल सुरवसे, मनोज डोलारे, विशाल थोरात, विवेक कापसे, मुकूंद घाटगे, खंडु राऊत, संकल्प पडवळ, अमोल सिरसट, प्रविण गोरे, सौरभ ढोबळे, संतोष माळी, बालाजी जगताप, विजय पवार, बंडू मदने आदींची उपस्थिती होती