कर्जत जामखेडचे आमदार रोहित राजेंद्र पवार यांनी शनिवार दि.२२ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्री तुळजाभवानी मातेस कुलधर्मकुलाचार केला कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवुन दिल्याच्या प्रित्यर्थ कुलदैवत श्री तुळजाभवानी देवीला साडी चोळी अर्पण करुन ओटी भरुन,नैवेद्य दाखवुन देवि चरणी नतमस्कतक होवुध आभार मानले
यावेळी मंहत वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा, पवार कुंटुंबियांचे पारंपारिक पुजारी श्री सुदर्शन पवार व सोमनाथ पवार, गोरक्षनाथ पवार, कृष्णा पवार आदी उपस्थितीत होते. देवीदर्शना नंतर मंदीर समितीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांनी त्यांच्या सत्कार केला यावेळी गोकुळ शिंदे , संदीप गंगणे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले कोरोना पॉझिटिव्ह असताना माझ्यावरील प्रेमापोटी मतदारसंघातील आणि काही बाहेरच्या कार्यकर्त्यांनी काळजीने तुळजाभवानीला साकडं घातलं होतं.त्यामुळं आज वैरागला (जि. सोलापूर) जाताना तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भविकांचीही भेट झाली अशी प्रतिक्रिया दिली आहेत