तामलवाडी. दि:- 23 जानेवारी 2022 महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या राज्यातील प्रतिनिधी समवेत शिक्षण आयुक्त कार्यालयात दिनांक 17 जानेवारी 2022 या दिवशी बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिक्षण संचालक मा. पालकर साहेबां सह शिक्षण विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शालेय स्तरावरील शिक्षकांच्या पदभरती, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी अशा विविध समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, उपाध्यक्ष आर डी पाटील, सचिव चांगदेव पिंगळे कार्यालयीन सचिव सुरेश मुळूक औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष आर. डी. खैरनार ,सातारा जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र माने पुणे शहराध्यक्ष कमलाकर डोके, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अंगद गरड, पाटील सचिन दुर्गाडे कल्याण अवसरे व इतर मान्यवर उपस्थित होते. शालेय स्तरावर बी .एड . समकक्ष बी .पी .एड ./ बी. एड. (फिजी.) अर्हतेच्या शिक्षकांच्या पदभरती निश्चितीचे निकष ठरविताना बी.एड., बी.पी.एड./बी.एड (फिजी.) या सर्व अर्हतेत भेदभाव न करता समान दर्जा द्यावा या अर्हतेच्या शिक्षकांना शासनाने दिनांक 14 मे 1987 रोजी निर्गमित केलेल्या अध्यादेशाला प्रमाणे निकष निश्चित करावेत व ही अर्हता प्राप्त करताना घेतलेल्या दोन्ही मेथड चा कार्यभार अध्यापनासाठी विचारात घेऊनच शारीरिक शिक्षण शिक्षकाची पद निश्चिती करावी अशी मागणी केली
हा शिक्षक केवळ शारीरिक शिक्षण विषय अध्यापन आपण पुरता मर्यादित नाही तर बीएड प्रमाणे हा शिक्षक ही दोन मेथड चे अध्यापन करण्यास पात्र आहे याबाबत शैक्षणिक पात्रतेच्या व समकक्ष तेच्या अनेक पैलूवर प्रकाश टाकण्यात आला शालेय स्तरावर विविध विषयाचे अध्यापन केले जाते यासाठी असलेल्या बी .एड / बी. पी.एड./ बी.एड (फिजी.) या अर्थ तेच्या शिक्षक पदा निश्चितीचे निकष ठरविताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता संच मान्यता व वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावात बी. एड . बरोबरच बी .पी .एड./ बी.एड. (शा. शि.) या अर्हते चा ही उल्लेख केला जावा तसेच दिनांक 14 मे 1987 च्या शासन निर्णयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे खाजगी शाळा सेवा शर्तीच्या नियमात सुधारणा करण्यासाठी असा प्रस्ताव माननीय संचालकांनी शासनाकडे पाठवावा अशी विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली व ती मान्य करण्यात आली शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या वरील बैठकीत संच मान्यता व वैयक्तिक मान्यता निकष यामधील सुधारणा सह वरिष्ठ व निवड श्रेणी अंशकालीन शिक्षक भरती प्रक्रिया आणि शालेय स्तरावरील सलग कार्यभार या संदर्भातील अनेक बाबीवर चर्चा करण्यात आली व वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी एम. पी. एड. होण्याची अट शिथिल करून इयत्ता दहावी पर्यंत अध्यापना साठी उपयुक्त असणाऱ्या कोणत्याही विषयाची उच्च पदवी प्राप्त अहर्ता मान्य करावी ही मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली याच बरोबर विद्यार्थी संख्येवर पदभरती करताना पुरेसा कार्यभार लक्षात घेण्याची अट टाकताना इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत असलेल्या माध्यमिक शाळेतील विषयवार सलग कार्यभार लक्षात घेण्यात यावा. ही मागणी करण्यात आली सलग कार्यभार यामुळे शालेय स्तरावरील अनेक समस्या दूर होणार असल्याचे या वेळी लक्षात आणून दिले
प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील विषय व वर्गवार अध्यापन कार्य पद्धती मधील फरक व समस्या आणि प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांचा सर्व वर्गांचा सलग कार्यभार लक्षात घेण्याची गरज लक्षात आणून दिली ही बैठक सुमारे अडीच तास चाललेल्या या सर्व विषयावरील चर्चा सकारात्मक होऊन भावी पिढीला दिशा देणारी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला असे मत महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी आपले मत व्यक्त केले त्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष प्रशांत घाडगे जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे जिल्हा सचिव अभयजी वाघोलीकर सहसचिव संजय देशमुख, संजय कोथळीकर ,सचिन पाटील ,तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रभाकर जाधव ,परांडा तालुका अध्यक्ष किरण देशमुख, उस्मानाबाद विवेक कापसे ,कळब लक्ष्मण मोहिते, उमरगा राजू सोलंकर, लोहारा मुकेश सोमवंशी,भूम अमर सुपेकर,वाशी शिवाजी आवारे तसेच तालुका सचिव उस्मानाबाद गुणवंत काळे, तुळजापूर राजेश बिलकुले, कळब सुभाष वाघमारे,उमरगा दिगंबर सरवदे, वाशी सोमनाथ केळे ,भूम विनोद शेजाळ ,परांडा नारायण खैरे लोहारा गोपाळ सुतार, या सर्व कार्यकर्त्यांनी शरच्चंद्र धारूरकर व त्यांचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले.