४ पिस्टल व ३ जिवंत काडतुसांसह ५ आरोपी अटकेत - Gan and live Pill

0


तुळजापूर  :- उस्मानाबाद ( osmanabad latur rod )- लातूर रस्त्यावरील पाचुंदा तलावाजवळ दोन पुरुष गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याची गोपनीय खबर तुळजापूर ( tuljapur police )  पो.ठा. च्या पथकास दि. 30.12.2021 रोजी 16.45 वा. सु.मिळाली होती.  यावर पथकाने लागलीच पाचुंदा तलाव परिसर गाठून खंडाळा, ता. तुळजापूर येथील राजेंद्र सुरेश कांबळे यांसह एका अल्पवयीन मुलास (विधी संघर्षग्रस्त बालक) पिस्टलसह ताब्यात घेतले होते.

उपरोक्त प्रकरणी दाखल असलेल्या तुळजापूर पो.ठा गु.नों.क्र. 465 / 2021 शस्त्र कायदा कलम- 36, 25 सह 188, 34 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 37, 135 च्या उर्वरीत तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सई भोरे-पाटील व तुळजापूर पो.ठा. चे पोनि- श्री. अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. सुशील चव्हाण, श्री. ज्ञानेश्वर कांबळे, पोउपनि- श्री राहुल रोटे, श्री. चनशेट्टी, पोहेकॉ- अजय सोनवणे, अतुल यादव, पोना- गणेश माळी, लक्ष्मी चव्हाण, अमोल भोपळे, गणेश पतंगे, अजित सोनवणे, बाळासाहेब देवबोणे यांच्या पथकाने तुळजापूर येथील 1) सचिन खंडु जाधव, वय 29 वर्षे 2) शैलेश श्रीकांत नरवडे, वय 23 वर्षे 3) विश्वजीत विजय आमृतराव, वय 25 वर्षे 4) सौरभ दत्तात्रय टोले, वय 22 वर्षे यांसह उस्मानाबाद येथील 5) मयुर बापु बनसोडे, वय 26 वर्षे यांना दि. 13 जानेवारी रोजी ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे‍ 4 पिस्टल सह 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तुळजापूर पोलीसांनी केलेल्या या यशस्वी कामगीरीचे पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top