उस्मानाबाद,दि.12(जिमाका):- येथील जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी
संबंधित जल जीवन मिशन अंतर्गत प्रपत्र 'ब' मधील 18 तर प्रपत्र 'क' मधील 14 अशा
एकूण 32 योजनांना आज जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, कार्यकारी अभियंता दशरथ देवकर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री.नाडगौडा,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.औटी, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक मेधा शिंदे आदी उपस्थित होते.
जल जीवन मिशनच्या प्रपत्र 'अ मधील योजनांची काम खूप चांगले होत आहेत, याबाबत संबंधिताचे अभिनंदन करून 'ब' व 'क' प्रपत्रातील योजनांच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित गावातील पाणीपुरवठा योजनांचे आराखडे राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून तसेच मराठवाड्यातील गेल्या 30 वर्षातील आवर्षण आणि अतिवृष्टीचा अभ्यास करून करावेत.
यात ग्रामस्थांना आणि जनावरांना शासन नियमानुसार देय असलेल्या पाण्याच्या अनुषंगाने 30 किंवा 15 वर्षातील संभाव्य लोकसंख्या आणि जनावरांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आराखडे करावेत,असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी सांगितले.
जल जीवन मिशन योजनेच्या प्रपत्र 'अ' अंतर्गत जिल्हयातील आठही तालुक्यात
249 योजनाचे काम करण्यात येणार आहे.या 249 पैकी 188 योजनाचे अंदाजपत्रक तयार
करण्यात आले आहेत, तर 55 योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याची गरज नाही. सहा
योजनांचे अंदाजपत्रक करण्याचे काम बाकी,असून 188 योजना ग्रामपंचायतीकडे सादर केल्या आहेत.तसेच 184 योजनांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
172 योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत, तर 152 योजनांची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत,तर 67 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.या योजनेतील प्रपत्र 'ब' मध्ये 339 एकूण योजना आहेत.त्यापैकी 210
योजनांचे भूलजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षाणाचे काम पूर्ण केले आहेत.192 योजनांचे
भूलजल सर्वेक्षण विभागाने प्रमाणपत्र दिले आहेत.127 योजनांचे स्थापत्य सर्वेक्षण पूर्ण
झाले आहे. 108 योजनाची अंदाजपत्रक तयार करण्यात आली आहेत. तांत्रिक मान्यता 61
योजनांना तर प्रशासकीय मान्यता 42 योजनांना देण्यात आली आहे.
या योजनेतील प्रपत्र 'क' मध्ये 136 योजनांचा समावेश आहे. 81 योजनांचे भूलजल
सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षणाचे काम केले असून त्यापैकी 69 योजनांचे प्रमाणपत्र ही भूलजल
सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाले आहेत.55 योजनांचे स्थापत्य सर्वेक्षणाचे काम पूर्ण
करण्यात आली आहे. जल जिवन मशीन मधील पाणी पुरवठयाच्या योजनांचे काम गतीने
करण्यासाठी जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून गती देण्यात येत आहे.
****