उस्मानाबाद - जनहित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सन २०२०-२१ आणि २०२१-२२ ची पुर्ण अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम घोषित केल्यानुसार हेक्टरी दहा हजार रूपये प्रमाणे द्यावी,सन २०२०-२१ खरीप,रब्बी,पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी,सन २०२१-२२ चा खरीप विमा शासनाच्या टक्केवारी नुसार जमा करावी,कुठल्याही अटी शर्ती न ठेवता सन २०२०-२१-२२ चा सरसकट विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी या मागण्या आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जनजनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
फेब्रुवारी १६, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा