श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

0


परंडा प्रतिनिधी-

( शालेय साहित्य वाटप करून  शिवजन्मोत्सव साजरा )

श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी व शंभुसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्ताने सूंदर हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा जि प प्रा शाळा कपिलापुरी येथे दोन गटामध्ये घेण्यात आली होती.
 शिवजयंती निमित्त कपिलापुरी येथे श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांनी स्वगृही च अत्यंत साधेपणाने शिवमूर्ती स्थापना व पूजन करून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज व  इतिहास लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याच्या हेतूने ऐतिहासिक  शब्दांचे सुंदर हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा हा उपक्रम राबविण्यात आला आहे व कोरोना काळात बंद चालू होत असलेल्या शाळामुळे विद्यार्थ्यांनचे अभ्यासातून दुर्लक्ष न होता गोडी निर्माण व्हावी याकरिता 
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना व 
जि प प्रा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे असे प्रतिष्ठाणचे शिवश्री रणजीत महादेव पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी जि. प.प्रा.शाळा कपिलापुरी मुख्याध्यापक कुलकर्णी,सहशिक्षक गरड,रणजित जैन,गावचे विद्यमान सरपंच वैभव आवाने,प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक महादेव पाटील,महेश आवाने,वैभव देवळकर,सुमित जैन,यश पाटील, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा शंभुसेना धाराशिव जिल्हाध्यक्ष रणजीत  महादेव पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top