छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महिलांसाठी मोफत रोग निदान व उपचार शिबिर

0

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महिलांसाठी मोफत रोग निदान व उपचार शिबिर 

लोहारा/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका सौ.आरती सतिश गिरी, ग्रामीण रुग्णालय लोहारा, स्पर्ष ग्रामीण रुग्णालय सास्तूर, लोहारा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भावना जपत प्रभागातील नागरीक व महिलांसाठी मोफत रोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या शितल राहुल पाटील होत्या. तर प्रमुख म्हणून नगराध्यक्षा सौ‌.वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना गटनेते सौ.सारीका प्रमोद बंगले, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते जालिंदर कोकणे, डॉ.संदिप उपळे, डॉ.राजु गायकवाड, डॉ.सुनिता चक्रवार, डॉ.पलवी शिंदे, नगरसेवक गौस मोमिन, अमिन सुंबेकर, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, नागणणा वकील, दिपक रोडगे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, अभिमान खराडे, बाळासाहेब पाटील, नगरसेवक विजय ढगे, प्रशांत काळे, आयुब अब्दुल शेख, श्रीकांत भरारे, के.डी.पाटील, शब्बीर गवंडी, आदि, उपस्थित होते. यावेळी सर्व आजारांवर डॉक्टरांनी तपासणी करुन निदान करुन औषध, गोळ्या मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे तर सुत्रसंचालन व आभार सतिश गिरी यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी दयानंद गिरी मित्रमंडळाचे उमाकांत लांडगे, गौरव गोसावी, स्वप्नील नारायणकर, योगेश गिरी, प्रशांत माळवदकर, शुभम गोसावी, अजय गोसावी, योगेश बाभळे, अदिंनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top