लोहारा/प्रतिनिधी
आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.वंदना भगत यांनी केले. लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.18 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शहाजी जाधव, प्रमुख अतिथी म्हणून सौ.वंदना भगत, नगरसेविका सौ.आरती गिरी, प्रमुख वक्ते म्हणून प्रा.यशवंत चंदनशिवे, पालक प्रतिनिधी रमेश वाघुले, सतीश गिरी, संचालिका सविता जाधव, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर स्कुलतर्फे मान्यवरांचे शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी स्कूलमधील विद्यार्थी छ.शिवरायांच्या वेशभूषा करून छ.शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडा, पाळणा, आणि गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी आपले विचार व मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते चंदनशिवे मार्गदर्शनपर बोलताना म्हणाले की, जिजाऊंनी बालपणात शिवरायांना श्रीराम, श्रीकृष्ण, भक्त प्रल्हाद, यांच्या विरतेचे आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सांगत आणि तूही शत्रूंचा नाश करून रयतेचे हिंदू राष्ट्र म्हणजेच स्वराज्य स्थापन करावे अशी शिकवण देत. त्यामुळेच अवघ्या 16 व्या वर्षी शिवरायांनी बाल मावळ्यांना सोबत घेवून रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. याप्रसंगी स्कूलमधील शिक्षक सिद्धेश्वर सुरवसे, परमेश्वर जाधव, व्यंकटेश पोतदार, हारून हेडडे , सोनाली रसाळ, शिवानी बिडवे, मयुरी नारायणकर, सोनाली बिडवे, मुस्कान मासुलदार, महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केले तर आभार मीरा माने यांनी मानले.