उस्मानाबाद शहरात २ ठिकाणी दरोडा , लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

0


 

उस्मानाबाद शहरात बँक कॉलनी व कर्मवीर नगर भागात चोरट्यांनी दरोडा टाकून लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे हि घटना 6 -7 फेब्रुवारी रोजी पहाटे घडली आहे

कारागृहाच्या च्या पाठीमागील कर्मवीर नगर येथील शाम शिनगारे यांच्या घरी दरोडेखोरांनी पहाटे चार वाजता सहा जणांनी दरोडा टाकला असून घरातील 25 हजार रुपये रोख रक्कम व 21 तोळे सोने मारहाण करून लुटले आहे

शिनगारे यांना लाकडी दंडुक्याने मारून जखमी केले असून त्याच्यावर सोलापूरमध्ये उपचार  चालू आहे  

व बँक कॉलनी मधील कनैय्या मदनुरकर यांच्या घरी चार दरोडेखोरांनी दार तोडून आत प्रवेश करून मारहाण करून घरातील चार हजार रुपये व गळ्यातील अंगावरील सोने घेतले व घरातील मुलींना धमकावले मुलीवर रेप करण्याची धमकी  दिलीकन्हैया मदनुरकर यांच्या डाव्या हाताला 3 फॅक्चर झाले सध्या उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top