उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उमरग्याचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार, नायब तहसीलदार पंकज मंदाडे आदीं प्रमुख उपस्थित होते.