उस्मानाबाद येथे ओ बी सी जनमोर्चा यांच्याकडून ओ बी सी आरक्षणासंदर्भात बैठक संपन्न

0
 उस्मानाबाद येथे ओ बी सी जनमोर्चा यांच्याकडून ओ बी सी आरक्षणासंदर्भात बैठक संपन्न

   *मागासवर्ग आयोगाचा  त्रोटक माहिती वरील अंतिम अहवाल ओबीसींना अमान्य

उस्मानाबाद :- ओबीसीचा राजकिय आरक्षणासंबंधी राज्य सरकारकडून मागासवर्गीय आयोगाला घाईगडबडीने देण्यात आलेला डाटा  हा अजिबात चुकीचा असून ओबीसींना राष्ट्रीय दृष्ट्या नव्हे तर  सर्वच बाबतीत  संपविण्याचे कारस्थान आहे. अपुरी व अविश्वसनीय त्रोटक माहिती मागासवर्गीय आयोगाला पुरवल्याबद्दल राज्य सरकारचा ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांनी निषेध केला असून सध्याचा डेटा वस्तुस्थितीला धरून नाही ओबीसींची लोकसंख्या 32 ते 38 टक्के पर्यंत आखण्यात आली असून ही आकडेवारी पूर्णपणे दिशाभूल करणारी असून मंडल आयोग सारख्या राष्ट्रीय आयोगाने 52 टक्के ग्राह्य धरली होती तरी सध्याची ओबीसी लोकसंख्या ही 60 टक्के च्या खाली असू शकत नाही अशाप्रकारे कसलीही कायदेशीर आधार नसलेली ओबीसी लोकसंख्या चुकीची माहिती देऊन राज्य सरकारला कोणाचे हित साधायचे आहे. त्यामुळे नक्कीच एक ओबीसींना  संपवण्याच षड्यंत्र आहे. त्यांचे षडयंत्र आम्ही ओबीसी जनमोर्चा उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.            
             यावेळी उपस्थित ओबीसी जनमोर्चा तील पदाधिकारी वरिष्ठ व्यक्ती उपस्थित होते. ओबीसी जनमोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री सचिन शेंडगे, श्री खंडेराव चौरे, पांडुरंग लाटे, पिराजी मंजुळे,इंद्रजीत देवकते,लक्ष्मीकांत खटके, नरसिंग मेटकरी, सतीश लोंढे, ब्रिजलाल कुरेशी, गणेश एडके, नागनाथ बोरगावे, कुरेशी वगव,व सर्व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top