Osmanabad :- मध्यवर्ती सार्वजानिक शिवजयंती महोत्सव समिती च्या आजच्या तिसऱ्या सञात शाहिर प्रसाद विधाते यांच्या पोवाड्याचा कार्यक्रमांने आज रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडली
गेल्या 32 वर्षा पासुन विविध उपक्रम घेत कार्यरत असलेल्या मध्यवर्ती सार्वजनिक महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आयोजित करत आज शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष धनाजी आनंदे, डाँ. पद्मसिंह पाटील शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विक्रम पाटील, भाई उध्वराव पाटील पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, दै. समय सारथी चे संपादक संतोष जाधव, देवानंद सुरवसे, बिभीषण पाटील, कुणाल गांधी, दिनेश वाभळे,रणजीत कदम,सचिन तावडे, शाम आप्पा जहागिरदार, समितीचे अध्यक्ष राम मुंडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
उस्मानाबाद च्या शिवजयंती ने आज संपुर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली असुन शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची प्रथा मध्यवर्ती सार्वजानिक शिवजयंती जपली असुन ही बाब कौतुकास्पद असुन असे उपक्रम होणे ही काळाची गरज आहे असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी व्यक्त केले.छञपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वानी अंगिकारले पाहिजे असे ही यावेळी ते बोलताना म्हणाले.
मध्यवर्ती शिवजयंती ला केमिस्ट आणि ड्रागिस्ट् असो चे नेहमीच सहकार्य राहील अशी ग्याही असो. चे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे प्रायोजक धनाजी आनंदे यांनी व्यक्त केले. अशा कार्यक्रमासाठी आम्ही सदैव सोबत राहु व मध्यवर्ती ने प्रथमच असे वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या बदल करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे मत धनाजी आनंदे यांनी व्यक्त केले.
छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी समितीच्या वतीने 100 अंध व कर्णबधिर असलेल्या दिव्यांग बांधवाना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक राम मुंडे व सुञसंचालन व आभार प्रदर्शन शिवाजी चव्हाण यांनी केले. यावेळी समितीचे सर्व आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.