उस्मानाबाद :-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शरदचंद्रजी पवार साहेब फाऊंडेशन उस्मानाबाद व श्री समर्थ इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाराज चौकात सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टीम बसवण्यात आले आहे आज लोकार्पण न.प. सी.ओ. हरिकल्यान यलगट्टे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार , वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मस्के सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी वाहतूक शाखेचे जावेद काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, नंदकुमार गवारे ,शहराध्यक्ष बबलू शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, अनिकेत पाटील नगसेवक बाबा मुजावर, मृत्युंजय बनसोडे, रोहित बागल, योगेश सोन्ने, जयंत देशमुख, अजय कोळी, ओंकार नायगावकर, अनिरुद्ध जोशी, इम्तियाज बागवान , इस्माईल शेख व शरदचंद्रजी पवार साहेब फाऊंडेशन उस्मानाबाद चे शेखर घोडके, रणवीर इंगळे, संदीप आंबेकर, केतन पुरी, ओंकार राजेनिंबाळकर, पंकज स्वामी , इत्यादी उपस्थित होते.
उस्मानाबाद नगरपालिकेचे सिओ हरी कल्याण येलगट्टे यांनी नागरिकांना आवाहान केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब फाउंडेशन च्या वतीने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे मी प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच शहरातील इतर फाउंडेशन यांनी पुढे येऊन आपल्या भागांमध्ये सीसीटीव्ही बसवून घ्यावे असे यावेळी आवाहन केले.