google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 वाईन विक्रीच्या विरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना निर्णय मागे घेण्यासाठी पोस्ट कार्ड पत्राद्वारे विनंती

वाईन विक्रीच्या विरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना निर्णय मागे घेण्यासाठी पोस्ट कार्ड पत्राद्वारे विनंती

0

महाविकास आघाडीच्या वाईन विक्रीच्या विरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना निर्णय मागे घेण्यासाठी पोस्ट कार्ड पत्राद्वारे विनंती

उस्मानाबाद :- महाविकास आघाडीसरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला आहे त्याचा भाजपा महिला मोर्चा उस्मानाबाद वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन महाराष्ट्र शासन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वाईन विक्रीचा निर्णय त्वरीत थांबवावा यासाठी पोस्ट कार्ड पाठवलेत. 


महा विकास आघाडीच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयामुळे तरुण पीढी व्यसनाधीनकडे जास्त वळुन महाराष्ट्रातील माय माऊल्यांच्या कुटुंबाचे खुप मोठे नुकसान होईल. होणाऱ्या या गंभीर परिणामांचा विचार करुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याची नोंद घेवून आमचा विरोध नोंदवावा असे या पत्रात म्हटले आहे. 


त्यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षअर्चनाताई अंबुरेशहराध्यक्ष ॲडव्होकेट ज्योती वाघेजिल्हा उपाध्यक्ष विद्या मानेसिंधु जाधव तर जिल्हा सरचिटणीस वर्षा पाटीललतिका पेठे आणि ओबीसीसेल उस्मानाबाद महिला मोर्चा तालुकाध्यक्ष साखर कांबळे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top