google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लोहारा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांंची बिनविरोध निवड

लोहारा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांंची बिनविरोध निवड

0

लोहारा/प्रतिनिधी
नगर पंचायत लोहारा शिवराष्ट्र शहरविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी वैशाली अभिमान खराडे यांचा एकमेव नामनिर्देशनपत्र व राष्ट्रवादी काँग्रेसकडुन उपनगराध्यक्ष पदासाठी आयुब शेख यांचा एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने या दोघांची बिनविरोध निवड झाली असल्याचे पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी जाहीर केले. यावेळी फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. 

यावेळी मुख्याध्याधगकारी गजानन शिंदे, कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे उपस्थित होते. यावेळी नगर पंचायतीच्या वतीने नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. व तसेच लोहारा शहरातील शिवाजी चौक येथे नुतन नगराध्यक्ष वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना गटनेते सारीका प्रमोद बंगले, राष्ट्रवादी गटनेते जालिंदर कोकणे यांच्यासह सर्व सदस्यांचा भव्य नागरी सत्कार माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते करुन सन्मानित करण्यात आले. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.ज्ञानराज चौगुले होते तर प्रमुख म्हणून शिवसेना पक्ष निरीक्षक अनंत पताडे, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, सभापती कृ.उ.बा. समिती उमरगा मोहयोद्दीन सुलतान, प्रशासक, शे.स.सा. का., किल्लारी तथा राष्ट्रवादी चे नेते किशोर साठे, माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस विजय लोमटे, माजी नगराध्यक्ष, उमरगा रजाक अत्तार, प्रशासक, शे.सह.का. किल्लारी शिवाजी कदम, जेष्ठ नेते रा.काँ. लोहारा अबुलवफा कादरी, युवा सेना उपजिल्हा प्रमुख नामदेव लोभे, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंखे, आदि, उपस्थित होते. 


यावेळी माजी खा‌‌.प्रा.रविंद्र गायकवाड व आ.ज्ञानराज चौगुले, किशोर साठे, सुनिल साळुंखे, यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, अभिमान खराडे, शहर प्रमुख सलीम शेख, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, श्रीनिवास माळी, दिपक रोडगे, माजी नगराध्यक्षा पोर्णिमाताई लांडगे, शिवसेना गटनेते सारीका प्रमोद बंगले, राष्ट्रवादी गटनेते जालिंदर कोकणे, 
 नगरसेवक गौस पठाण, नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार, शामल बळीराम माळी, शमाबी आयुब शेख, कमल राम भरारे, सुमन दिपक रोडगे, आरती ओम कोरे, अमिन सुंबेकर, आयुब अब्दुल शेख, परवेज तांबोळी, धर्मवीर जाधव, दत्ता मोरे, रोहन खराडे, यांच्यासह नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top