Osmanabad:-
उस्मानाबाद जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखलं जातं पण जिल्ह्यातील शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून ही ओळख पुसण्याचे काम करत आहेत.
कळंब तालुक्यातल्या शिराढोन येथील प्रयोगशील शेतकरी नामदेव माकोडे यांनी आपल्या शेतामध्ये असाच वेगळा प्रयोग करत औषधी गुणधर्म असलेल्या चिया नावाच्या बियाण्यांची लागवड तीन एकरावर केलेली आहे. सर्वात जास्त पौष्टिक अन्नपदार्थ असून याला आयुर्वेदामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे
चिया बियाणे हे अनेक आजारावर उपयोगी ठरत असून याची बाहेर राज्यातील बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे.
चिया बियांचा आकार हा खूप बारीक असतो. चिया बियाण्यांचा रंग हा पांढरा, तपकिरी किंवा काळा असतो.
शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले असून, शेतकरी हे नवनवीन प्रयोग करून आर्थिक उत्पन्न वाढवत आहेत. त्यामुळे तोट्यातील शेती नफ्यात आली आहे. नव युवक सुध्दा शेतीमध्ये विशेष लक्ष घालून नवीन प्रयोग करून लाखोची कमाई करत आहेत.
चिया बियाणे हरियाणा येथुन ऑनलाइन मागवले असून, दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी लागवड करण्यात आली आहे. साडेतीन महिन्याचे हे पीक आहे. याला आतापर्यंत 12 हजार रुपये खर्च करावा लागला.
चिया बियाणे हे इतर खाद्य बियाणे प्रमाणेच असतात. त्यांचात असलेल्या पोषक व औषधी तत्वांमुळे खाण्यात त्यांचा वापर करण्यात येतो. खरंतर चिया बियाणे हे परदेशातून आपण आयात करतो. आज चिया बियाण्यांचा आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.