Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.03 मार्च :- दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुयोग्य , सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील वरिष्ठ दर्जाचे अधिका-यांनी परीक्षा केंद्रास भेटी द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) ची परीक्षा 4 मार्च ते 7 मार्च 2022 दरम्यान जिल्ह्यातील 39 मुख्य केंद्र आणि 113 उपकेंद्रांवर होणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 16 हजार 765 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) ची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 दरम्यान जिल्ह्यातील 84 मुख्य केंद्र आणि 311 उपकेंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी 22 हजार 720 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा सुरळीत आणि निकोप वातावरणात पार पडावी यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी,नायब तहसीलदार,सहायक गटविकास अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि सर्व विभागाचे विभागप्रमुख इत्यादी अधिकारी विविध केंद्रांना भेटी देणार आहेत.
******