google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 रशियाने युक्रेन वरील बाॅम्ब हल्ले थांबविले पाहिजेत - सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची राष्ट्रपती सह प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी

रशियाने युक्रेन वरील बाॅम्ब हल्ले थांबविले पाहिजेत - सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची राष्ट्रपती सह प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी

0


 Osmanabad news | उस्मानाबाद :-  गेल्या सात दिवसांपासून रशिया व युक्रेन युध्द चालु असुन रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह वरती बाॅम्ब हल्ले करून सर्व सीमा पार केल्या आहेत,मनुष्य हाणी तर होतच आहे परंतु इतर देशांतील विनंतीला मान न देता रशिया युक्रेनवरती कब्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करित आहे,कदाचित परिस्थिती नुसार युध्दाची वेळ आली असणार आणि यातुनच अवघ्या जगाला बलाढ्य असल्याची कबुली रशिया देत असावा.कारण तिसऱ्या महायुद्धाचे संकेत ते वारंवार देत आहेत,भारतीय विद्यार्थी या युध्दात मयत झाले आहेत,गरज राहिल वास्तवतेची भारत देशच नव्हे तर संपूर्ण जग या युद्धापासुन चिंताग्रस्त आहेत,युद्ध होतात,प्रश्न मिटतात परंतु धग मात्र कायम राहते.आज युक्रेन जळतोय विव्हळतोय,माणुस दगावतोय शेजारील राष्ट्रे केवळ हळहळतात, प्रत्येक जण युध्द थांबवा म्हणतोय,नको युध्द हवा बुध्द असे स्वर निघत आहेत. युध्दातील सैनिक देखिल त्यांच्या आईला संदेश देतोय युध्द थांबले पाहिजे..
हे युध्द इथेच थांबले पाहिजे यासाठी आपण इतर राष्ट्रांच्या प्रमुखांशी चर्चा करुन रशिया व युक्रेन राष्ट्रप्रमुखांशी शांततेने समेट घडवुन आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.रशिया व युक्रेन दोन्ही राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्ष साहेबांना विनंती करतो की,आपण युध्दाला इथेच थांबवुन शांततेच्या मार्गाने मतभेदाला मिटवावे.. अशी विनंती उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभजी दिवेगावकर यांच्या द्वारे लेखी निवेदन राष्ट्रपती रामनाथजी कोविंद,प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र राज्य यांच्या कडे लेखी निवेदन देऊन ई-मेल द्वारे ही विनंती केली आहे,निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने,सरफराज पटेल, अविनाश नन्नवरे,महादेव राजगुरू,दादा बामणकर, विश्वजीत कांबळे,विशाल घरबुडवे,जगदिश कार्लेकर,बाबा साळुंके,बापु कटारे यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top